top of page

 कुर्यात बटोर्मंगलम्

मौंज  । मुंज  । व्रतबंध

"व्रतबंध" म्हणजेच व्रत किंवा नियामांची बद्धता . सयंमी , शान्त आणि यशस्वी जीवनाचा पाया घालण्यासाठी आणि उत्तम व निकोप शारिरीक आणि मानसिक विकासासाठी केला जाणारा हा विधी बालकाला विद्याभ्यासासाठी गुरूच्या सानिध्यात नेण्याचा एक संस्कार म्हणून पूर्वापार पासून करण्यात येतो. कष्टांसाठी कम्बर कसण्याची पूर्वतयारी म्हणून बटूच्या कमरेत "मुंज" नावाच्या दर्भाची दोरी  किंवा मेखला बांधली जाते आणि म्हणूनच हा विधी मौंज किंवा मौंजीबंधन म्हणूनही ओळखला जातो. 'वट' या संस्कृत शब्दाचा अर्थ बांधणे असा देखील होतो . म्हणून मुंज होणाऱ्या बालकास "बटू " देखील म्हणतात. 

सुवर्ण 'ज इव्हेंट्स च्या माध्यमातून आपण आपल्या बालकाच्या आयुष्यातील ह्या स्वावलम्बन सत्राच्या सुरवातीच्या शुभकार्याचा आनंद शास्रोक्त आणि रितीरिवाजानुसार  कार्य करून जरूर घेऊ शकता . 

सुवर्णा 'ज इव्हेंट्स मध्ये आम्ही आपल्याला या सोहळ्यातील सर्व विधींच्या तयारीची संपूर्ण तयारी विनासायास करण्यास मदत करू  जेणेकरून आपण आपल्या बालकाच्या आणि येणाऱ्या पाहुण्यांच्या सहवासात अधिकाधीक वेळ देऊ शकाल. 

मुंजविधी मध्ये केल्या जाणाऱ्या विविध संस्कारांची सुवर्णा 'ज इव्हेंट्स च्या टीम ला संपूर्ण माहिती असल्याने  -   मातृभोजन ,  अक्षतारोपण ,अग्निस्थापना , वस्त्रधारण,  अजीनधारण, यज्ञोपवीतधारण,  प्रधानधारण , अवक्षरण , अग्निकार्य, विभूतीधारण , गायत्रीउपदेश, मेखलाधारण ,दंडधारण ,आचारबोध , भिक्षावळ 
या साऱ्या विधीच्या संपूर्ण तयारी मध्ये आमची टीम सदैव आपल्या बरोबर राहील 

  • स्टेज चे डेकोरेशन  (थीम नुसार -  पेशवाई , गुरुकुल इत्यादी प्रकारचे देखावे )

  • पूजेची संपूर्ण तयारी 

  • फुलांच्या पायघड्या

  • भिक्षावळी साठी  ५ प्रकारच्या परड्या 

  • रांगोळ्या 

  • हार , गजरे 

  • अष्टवर्गाला मौंजेच्या गाण्यांचे गायन करणार्या बायका 

  • गुरुजी 

या सार्यांची तयारी आपल्या आवशक्यते आणि गरजे नुसार व बजेट ला अनुसरून करण्यासाठी जरूर आमच्याशी संपर्क साधा. 
 

bottom of page