top of page

१५ वर्षांपासूनची  महाराष्ट्रीयन  लग्नसोहळे, सण  आणि सांस्कृतीक कार्यक्रम आयोजनाची परंपरा

१५ वर्षांची मराठी शुभकार्य नियोजनाची परंपरा 

One Stop Solution for wedding, Festivals and events Celebrations

लग्नापासून - बारश्या पर्यंत  सर्व  शुभकार्ये, सण आणि समारंभ  नियोजनासाठी  

सुवर्णा 'ज 'इव्हेंट्स  ही  आमची नागपूरस्थीत  "इव्हेंट मॅनॅजमेण्ट आणि वेडिंग प्लॅनर" संस्था सौ  सुवर्णा राजीव कायंदे यांनी साधारण १५ वर्षांपूर्वी सुरु केली आणि तेव्हा पासूनआजतागायत २५०० हून अधिक लग्न सोहळे आणि महाराष्ट्रीयन सणवार यात  आम्ही आमची यशस्वी वाटचाल सुरु ठेवली आहे .

आमचा या क्षेत्रातला इतक्या वर्षांचा अनुभव , कलागुण आणि आवड याची योग्य सांगड तुमच्या शुभकार्याच्या नियोजना पासून कार्यपूर्ती पर्यंत तुमच्या पाठीशी राहील.

आपल्या महाराष्ट्रीयन पारंपारीक विवाह सोहळ्यात आणि  इतर समारंभात  जसे की - चैत्रातली संक्रांत आणि हळदी - कुंकू , बारसे, डोहाळजेवण , श्रावणातील मंगळागौर ... आपल्या रूढी आणि रिवाजांना अनुसरून कार्य पार  व्हावे या कडे आपल्या सर्वांचाच कल असतो .  आजकालच्या धकाधकीच्या आणि आधुनीक  युगात बऱ्याचदा आपल्याला  समारंभ परिपूर्णरित्या साजरा करण्याची हौस असते पण कधी वेळ नसतो, किंवा कधी नवीन पिढीला सोहोळ्यातल्या सगळ्या विधीं बद्दल आणि त्या अनुषंगाने लागणाऱ्या साहित्य आणि तयारी बद्दल माहिती नसते , कधी हौस आणि बजेट याचा ताळमेळ कसा घालावा याचा अंदाज नसतो, तर कधी आपल्याला पारंपारिक  आणि आधुनीक गोष्टींचा मेळ घालून एक सर्वाना अनुकूल असा सोहळा साजरा करायचा असतो ....

व्यक्ती तितक्या प्रकृती या उक्तीला अनुसरून  प्रत्येक  परिवाराला आपल्याकडचा सण अथवा समारंभ संस्मरणीय तसेच युनिक करण्याची इच्छा असते. आलेला पै पाहुणा खूष होऊन, तृप्त होऊन आणि आनंदाच्या आठवणी घेऊन जावा आणि आपल्या करता जन्मभराच्या गोड आठवणी निर्माण करून जावा हीच छोटीशी इच्छा मनात असते. तुमच्या  या इच्छाना मूर्त स्वरूप देण्यास 'सुवर्णा 'ज 'इव्हेंट्स' गेले  १५ पेक्षा अधिक वर्ष कार्यान्वित  आहे . मराठमोळ्या सण समारंभां बरोबरच  आम्ही जेष्ठांचे वाढदिवस  जसे एकषष्ठी, अमृत  महोत्सव, सहस्रचंद्र दर्शन सोहळा , विवाह वर्धापनदिन (आनिव्हर्सरी), छोट्या मुलांचे थिम बेस्ड वाढदिवस इत्यादी इव्हेंट्स देखील ऑर्गनाईझ करतो. आमच्या अनेक ग्राहका बरोबर आमचे घरगुती आणि जिव्हाळ्याचे सम्बन्ध निर्माण झाले आहेत . 

मराठमोळ्या शुभकार्यानमध्ये  आमच्या सेवांचा जरूर लाभ घ्या.आपल्या इच्छेनुसरून आणि बजेट नुसार समारंभ व्यवस्थापन आणि मार्गदर्शन करण्यास आम्ही उत्सुक आहोत.

तुमचे आनंदाचे क्षण सोनेरी करण्यासाठी आणि शुभकार्याच्या  व्यवस्थापनासाठी जरूर सुवर्णा 'ज इव्हेंट्सला कॉल करा .
 

bottom of page