top of page

"सख्यांनो डोहाळे माझे पुरवा.."

with

Suvarna's Events

डोहाळजेवण 

बाळ जन्माला येणार ही बातमीच  आनंदाची, भाग्याची . त्या मुले बाळंतिणीचे कोडकौतूक करण्याची आणि तिचे सगळे डोहाळे पुरवण्याची घरातल्या सर्वांचीच इच्छा असते .  साधारण गरोदरपणाच्या ७ व्या महिन्यात मुलीला माहेरी पाठ्वण्या आधी सासरची मंडळी डोहाळे जेवणाचा समारंभ करतात .  होऊ घातलेल्या आईच्या साऱ्या इच्छा पुरवणे  आणि तिला आनंदित ठेवणे हा या मागचा हेतू.  माहेरी देखील  डोहाळे जेवण करण्याची प्रथा आहे.  मुलीला बागेत, झोपाळ्यावर,
 नावेत , झुल्यावर , मखरात बसवून फुलांनी सजवून तिचे खाण्या पिण्याचे  लाड पुरवण्याची पद्धत आहे .
संध्याकाळी सूर्यास्ता आधी केल्या जाणाऱ्या या सोहळ्यात गर्भवतीला हिरव्या रंगाची साडी देऊन ५ फळांनी  तिच्या  सासूबाई तिची ओटी भारतात . जेवणासाठी पंच पक्वान्न  -  १ स्त्रीलिंगी आणि १ पुल्लिंगी पक्वान्न करतात. जसे कि - खीर आणि लाडू . गर्भवती महिला जे  पक्वान्न निवडेल त्या नुसार मुलगा किंवा मुलगी हे ठरवण्याचा हा फक्त १ खेळ आहे . फुलांची , चांदण्याची वाडी भरणे आणि  इतर खेळ हे आप्त स्वकीय आणि  इतर ओळखीच्या महिलांबरोबर खेळले जातात उखाणे आणि गाणी म्हटली जातात . ज्या मुळे  गर्भवती महिलेचं  मन प्रसन्न राहते . 

सुवर्णा 'ज  इव्हेंट्स द्वारा आम्ही आमच्या अनेक mother-to-be, गर्भवतींच्या सोहळ्याचे नियोजन केलेले आहे. समारंभात गायन करण्यासाठी आणि कार्याचे पारंपरिक विधी सांगण्यासाठी आमच्या जाणकार महिला आपणास मदत करण्यात तत्पर असतात.  

  • स्टेज डेकोरेशन (Theme Based) -  झोपाळ्याची सजावट  (फुलांची सजावट, चंद्रकोर, बोट, धनुष्य-बाण  या आणि इतर आवडीच्या थीम प्रमाणे)

  • टीटेबल सजावट 

  • चांदीचे ताट , वाट्या 

  • रांगोळ्या, फुलांचे दागिने 

  • फुलांची वाडी ,गजरे 

  • समारंभात गायन

वरील सेवांचा लाभ घेण्यासाठी जरूर आम्हाला संपर्क करा आणि आपल्या इच्छा , गरजा  आणि बजेट नुसार आपला सोहळा आनंददायी करा . 

bottom of page